Sun, May 26, 2019 14:45होमपेज › Soneri › कौटुंबिक प्रेमाचा गुंता सोडवणारा मोगरा फुलला

कौटुंबिक प्रेमाचा गुंता सोडवणारा मोगरा फुलला

Published On: Mar 15 2019 1:49AM | Last Updated: Mar 14 2019 8:45PM
या  चित्रपटांमध्ये स्वप्नील जोशी याच्याबरोबर साई शक्ती आनंद, नीना कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, संदीप पाठक, सुहिता थत्ते, आनंद इंगळे, समिधा गुरू, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ति भागवत, प्राची जोशी, विक्रम गायकवाड, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.

प्रख्यात दिग्दर्शिका श्रावणी देवधर ह्या बर्‍याच वर्षांनी ‘मोगरा फुलला’च्या माध्यमातून दिग्दर्शनाकडे परत वळल्या आहेत. त्यांनी याआधी  लपंडाव, सरकारनामा, लेकरू असे अनेक गाजलेले चित्रपट दिग्दर्शित केले होते. ‘मोगरा फुलला’ला स्वतःचा असा वेगळा टच देण्यास त्या सज्ज झाल्या आहेत. ‘मोगरा फुलला’ या चित्रपटाच्या माध्यमातून मी बर्‍याच वर्षांनी दिग्दर्शनामध्ये पुनरागमन करत असल्याचा मला अत्यंत आनंद आहे. ही आगळ्या पद्धतीने गुंफलेली अशी प्रेमकथा आहे. कौटुंबिक समस्यांमध्ये गुंतलेल्या एका मुलाभोवती ही कथा फिरते. त्याच्या या समस्यांमुळे त्याच्या लक्षातही येत नाही की, आपले लग्नाचे वय उलटून गेले आहे.

एके दिवशी तो अत्यंत खंबीर आणि स्वतंत्र विचाराच्या मुलीच्या प्रेमात पडतो. ती एका वेगळ्या वातावरणात वाढलेली मुलगी आहे. त्याच्याही लक्षात जेव्हा प्रेमाची ही बाब येते तेव्हा ही प्रेमकथा खूप पुढे सरकलेली असते, असे उद्गार दिग्दर्शिका श्रावणी देवधर यांनी चित्रपटाच्या मुहूर्ताच्यावेळी काढले. अर्जुनसिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘मोगरा फुलला’ची निर्मिती करत असल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. या चित्रपटाची कथा मराठी प्रेक्षकांना नक्कीच भावेल. असे उद्गार अर्जुनसिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांनी काढले.