Fri, Dec 13, 2019 18:06होमपेज › Soneri › भागवत, योगींविरोधात अपशब्‍द, कौरविरोधात देशद्रोहाचा गुन्‍हा  

भागवत, योगींविरोधात अपशब्‍द, कौरविरोधात देशद्रोहाचा गुन्‍हा  

Published On: Jun 20 2019 3:33PM | Last Updated: Jun 20 2019 3:44PM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्‍याविरोधात वादग्रस्‍त वक्‍तव्‍य करणे गायिका हार्ड कौरला महाग पडले आहे. हार्ड कौरने मोहन भागवत आणि आदित्‍यनाथ यांचे फोटो शेअर करत अपशब्‍द लिहिले होते.  

आता या प्रकरणी वाराणसीतील केन्ट ठाण्‍यात पोलिसांनी पंजाबी गायिका हार्ड कौर विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिसांनी कलम 153 A 124 A 500, 505 आणि 66 आयटी कलमअंतर्गत गुन्‍हा दाखल केला आहे. कलम 124 A देशद्रोहाशी संबंधित आहे. 

काय आहे प्रकरण? 

गायिका कौरने सोशल मीडियावर योगी आणि भागवत यांच्‍याविरोधात वादग्रस्‍त पोस्ट केले होते. तिने या दिग्‍गजांविरोधात लिहिल्‍याने तिला ट्रोल केले गेले. तिने आपल्‍या इन्‍स्‍टाग्राम अकाउंटवर एकानंतर एक पोस्ट केल्‍या होत्‍या. 

वाचा : गायिकेचे मोहन भागवतांबद्‍दल वादग्रस्‍त वक्‍तव्‍य, योगींनाही अपशब्द

हार्ड कौरने Who killed Karkare नावाच्‍या एका पुस्‍तकाच्‍या पहिल्‍या पानाचा फोटोदेखील शेअर केला होता. ते पुस्‍तक S M Mushrif यांनी लिहिले आहे. योगी आदित्‍यनाथ आणि मोहन भागवत यांच्‍याविषयी केलेल्‍या वक्‍तव्‍यावरून युजर्सनी तिला सडेतोड उत्तर दिले होते.