Mon, Jun 01, 2020 22:15
    ब्रेकिंग    होमपेज › Soneri › 'मोदी-जर्नी ऑफ द कॉमन मॅन' वेबसीरीज थांबवली 

'मोदी-जर्नी ऑफ द कॉमन मॅन' वेबसीरीज थांबवली 

Published On: Apr 20 2019 4:05PM | Last Updated: Apr 20 2019 4:05PM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

मोदी-जर्नी ऑफ द कॉमन मॅन वेबसीरीज थांबवली. नरेंद्र मोदींच्‍या आयुष्‍यावरील ही वेबसीरीज आहे. ही कारवाई निवडणूक आयोगाने केली आहे.  

'मोदी: जर्नी ऑफ ए कॉमन मॅन' या  वेबसीरीजमध्‍ये नरेंद्र मोदी यांची भूमिका महेश ठाकुरने साकारली आहे. 

या वेबसीरीजमध्‍ये राजकीय क्षेत्रातील संघर्षापेक्षा जीवनाचा संघर्ष दाखवण्‍यात आल्‍याचे समजते. जर्नी ऑफ ए कॉमन मॅनमध्‍ये पीएम मोदी यांचे बालपण आणि नंतरचे राजकीय करिअर दाखवण्‍यात आले आहे. ही वेबसीरीज ओ माय गॉडचे दिग्‍दर्शक उमेश शुक्ला यांनी आणली आहे. वेब सीरीजच्‍याविषयी शुक्ला यांनी आधी स्‍पष्‍ट केले आहे की, ते कुठल्‍याही चित्रपट अभिनेते-अभिनेत्रींवर वेबसीरीज आणणार नाही.