Fri, Nov 24, 2017 20:17होमपेज › Soneri › ‘पद्मावती प्रदर्शित होणारच’

पद्मावतीवर पहिल्यांदाच बोलली दीपिका

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री दीपिका पादूकोणच्या आगामी ‘पद्मावती’ सिनेमावर संकटांचे सावट आहे. देशभरातून या सिनेमाला विरोध होत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावती’ प्रदर्शित होईल की नाही यावर शंका व्यक्त केली जात आहे. या वादावर पहिल्यांदाच दीपिकाने ‘पद्मावती प्रदर्शित होणारच’ असे उत्तर दिले आहे. 

‘लोकांना ही कहाणी सांगण्याचा मला अभिमान आहे, या कहाणीला आज लोकांना सांगण्याची गरज आहे. आणि एक महिला म्हणूनही मी या सिनेमाचा भाग आहे.’

दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्यावर इतिहासाची छेडछाड केल्याचा आरोप करत हा सिनेमा प्रदर्शित केला जाऊ नये असे अशी मागणी अनेक संघटनांनी आहे. असे असतानाही दीपिकाला पूर्ण विश्वास आहे की हा सिनेमा १ डिसेंबरला प्रदर्शित होणारच. 

पद्मावतीच्या वादाबाबत बोलताना दीपिका म्हणाली की,‘हे खूपच भयानक आहे, या वादातून आपल्याला काय मिळाले, एक राष्ट्र म्हणून आपण कुठे पोहोचलो आहोत. आपण पुन्हा मागे तर जात नाही ना? आम्ही फक्त सेन्सॉर बोर्डला उत्तर देण्यास बांधील आहोत, मला माहित आहे की, पद्मावतीला प्रदर्शित होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. तसेच हा सिनेमा बॉलिवूडमधील एक महत्त्वाची लढाई लढत आहे यामुळेच या चित्रपटाला समर्थन मिळत आहे.’  

‘प्रत्येक अभिनेत्रीला अशी संधी मिळत नाही ती मला मिळाली आहे, आणि मी त्याचा पुरेपूर आनंद घेत आहे.’ असे दीपिकाने ‘राणी पद्मावती’च्या भूमिकेबद्दल बोलताना सांगितले. 

‘पद्मावती’मध्ये दीपिका प्रमुख भूमिकेत असून राजा महारावल रतन सिंहच्या भूमिकेत शाहिद कपूर दिसणार आहे. तर पहिल्यांदाच  खलनायकाच्या भूमिकेत रणवीर सिंह दिसणार आहे.