Wed, Nov 14, 2018 12:14होमपेज › Soneri › ‘या’ कारणांमुळे बाहुबली लोकप्रिय ठरला...

‘या’ कारणांमुळे बाहुबली लोकप्रिय ठरला...

Published On: Dec 07 2017 5:20PM | Last Updated: Dec 07 2017 5:45PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

बाहुबली सिरिजने भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवा इतिहास घडवला आहे. कमाईचे अनेक तुफानी विक्रम या चित्रपटाने मोडीत काढले आहेत. बाहुबली सिरीजला ला चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. हा चित्रपट यशस्वी होण्यामागे अनेक कारणे आहेत. दिग्दर्शक एस. राजामौली यांची मेहनत, ग्राफीक, स्पेशल इफेक्ट्स, चित्रपटाचे कथानक आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे हा चित्रपट चर्चेत राहीला . 

Related image

 

बाहुबलीचा पहिला भाग २०१५ मध्ये प्रदर्शित झाला, तर त्याचा दुसरा भाग २०१७ ला प्रदर्शित झाला. बाहुबली २ ने १५०० कोटीची कमाई करत हा चित्रपट सर्वात लोकप्रिय ठरला  आहे. या चित्रपटाला यशस्वी करण्यासाठी अनेक लोक झटत होते. 

Image result for bahubali

 

बाहुबली एक चा शेवट ‘'कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा’ असा सस्पेन्सने केल्याने दुसरा भाग पाहण्याची उत्सुकता चाहत्यांच्या मनात निर्माण केली होती. असे असले तरी अजून काही गोष्टी हा चित्रपट यशस्वी होण्यास कारणीभूत आहेत. बाहुबलीला सिनेमाच्या उंच शिखरावर पोहोचवणारी काही कारणे.....

Image result for bahubali

बाहुबली २ या चित्रपटासाठी २० एकरचा सेट उभारण्यात आला होता. 

Related image

बाहुबली २ या चित्रपटासाठी २००० कामगार रात्रंदिवस काम करत होते.

बाहुबलीमधील एक सीन फक्त २ मिनीटाचा होता.पण, हा २ मिनीटाचा सीन शुट करण्यासाठी १०० दिवस लागले होते.

Image result for bahubali

 

या चित्रपटात २५०० VFX सीन आहेत. तसेच  या प्रोजेक्टसाठी ३५ स्टुडिओजनी काम केले आहे.

Related image

बाहुबली हिंदी व्हर्जनसाठी टी.व्ही सिरीयल मधील अभिनेता शरद केळेकर याचा आवाज बाहुबलीला देण्यात आला होता.

Image result for bahubali shots

चित्रपटातील प्रत्येक पात्रासाठी प्रत्येकी १५०० दागिने बनवण्यात आले. 

या चित्रपटासाठी प्रभासने ३० किलो वजन कमी केले. नियमीत व्यायामासाठी दीड कोटींचे साहित्य खरेदी करण्यात आले होते.

Related image