Thu, Mar 21, 2019 00:53होमपेज › Soneri › ‘अँकर माईकवर ओरडला..आर्ची आली रे...’video

‘अँकर माईकवर ओरडला..आर्ची आली रे...’video

Published On: Apr 16 2018 3:45PM | Last Updated: Apr 16 2018 4:24PMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

'सैराट'च्या आर्चीचं स्टारडम अजूनही कमी झालेलं नाही. फुटबॉलच्या चाहत्यांनी खचाखच भरलेलं शाहू स्टेडियम आणि 'सैराट'च्या आर्चीची म्हणजेच रिंकू राजगुरूची एन्ट्री झाली. अख्ख्या स्टेडियममध्ये आर्चीच्या नावाचा एकच जल्लोष होत होता. ...आणि मग अँकर माईकवर एकदम ओरडला...आर्ची आली रे....हा प्रसंग आहे कोल्हापूरच्या अटल चषक फुटबॉलच्या अंतिम सामन्यावेळचा. 

एकीकडे पीटीएमच्या विजयाचा जल्लोष आणि दुसरीकडे आर्ची, त्यामुळे कोल्हापूरच्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेला चार चाँद लागले. यावेळी आर्चीसह आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू तेजस्विनी सावंत, आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अनिकेत जाधव आणि इतर सेलिब्रिटी आणि दिग्गज मंडळींचीही उपस्थिती होती.   

कोल्हापूरच्या शाहू स्टेडियमवर झालेल्या अटल चषक स्पर्धेत दुसर्या हाफनंतर आर्ची स्टेडियममध्ये आली. त्यानंतर गायक अवधुत गुप्तेनेदेखील स्टेडियममध्ये हजेरी लावली. आर्ची, तेजस्विनी आणि अवधूत गुप्ते यांनी ओपन जीपमधून मैदानातून फेरी मारली. 

आर्ची म्हटलं की आठवतयं, ती म्हणजे 'सैराट'मधल्या परशाची आर्ची. चित्रपटातली एखादी अभिनेत्री म्हटलं की, स्लिम आणि सुंदर अशी तिची प्रतिमा ठरलेलं. पण, आर्ची सुंदर तर आहेच शिवाय तिची बोल्ड काया असूनही तिनं यशाचं उत्तुंग शिखर गाठलं. 'सैराट'मध्ये तिची प्रतिमा तुम्ही पाहिलीचं असेल. परंतु, ती दि. १४ एप्रिलला ज्यावेळी कोल्हापुरतल्या शाहू स्टेडियमवर आली. तिच्या दिसण्यात एक बदल जाणवला. तो म्हणजे, 'आर्चीचा फिटनेस एकदम चांगला झालेला दिसला. तिचं गोड हास्यदेखील प्रसारमाध्यमांनी कॅमेऱ्यात टिपलं. पीटीएमच्या विजयाचा जल्लोष झाल्यानंतर आर्चीने मनोगत व्यक्त केलं आणि कोल्हापूरच्या खेळाडूंचं भरभरून कौतुकही केले. शेवटी अवधूतने 'नाद खुळा...पुरेपूर कोल्हापूर...माझं कोल्हापूर' हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.