Tue, Mar 26, 2019 08:03होमपेज › Soneri › #MeTooचे आरोप गंभीर घेऊ नका : असरानी

#MeTooचे आरोप गंभीर घेऊ नका : असरानी

Published On: Oct 11 2018 1:07PM | Last Updated: Oct 11 2018 1:07PMमुंबई : प्रतिनिधी 

हॉलिवूडचे #MeToo वादळ बॉलिवूडमध्ये धडकल्यावर इंडस्ट्रीमधील दिग्गज कलाकार चांगलेच अडचणीत आले आहेत. अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर आरोप करून ‘जोर का झटका’ दिला आणि एका पाठोपाठ एक असे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. मात्र त्याच वेळी, ‘हे आरोप फक्त प्रसिद्धी आणि फिल्म प्रमोशनसाठी केले जात आहेत. फार सिरीयसली घेऊ नका’, असे विधान ज्येष्ठ हास्य अभिनेते असरानी यांनी केले आहे.

महिलांचा सन्मान केलाच पाहिजे, अशी भूमिका मांडतानाच सध्या सुरू असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे असरानी यांनी माध्यमांशी बोलताना  म्हटले आहे.‘मी महिलांना सन्मानपूर्वक पाठिंबा देतो, सर्वांनीच तसे करायला पाहिजे. पण सध्या जे सुरू आहे ते केवळ प्रसिद्धीसाठी आहे, फिल्म प्रमोशनसाठी सुरू आहे, दुसरे काही नाही. फक्त आरोप करण्याला काही अर्थ नाही. हे फार गंभीरपणे (सिरीयसली) घेऊ नका, असे असरानी यांनी म्हटले आहे.