Thu, Mar 21, 2019 23:46
    ब्रेकिंग    होमपेज › Soneri › पोटगीसाठी अँजेलिना पिटविरोधात कोर्टात 

पोटगीसाठी अँजेलिना ब्रॅड पिटविरोधात कोर्टात  

Published On: Aug 10 2018 5:56PM | Last Updated: Aug 10 2018 6:00PMनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

अमेरिकन अभिनेता ब्रॅड पिट आणि अभिनेत्री अँजेलिना जोली २०१६ मध्‍ये वेगळे झाले होते. आता मुलांच्‍या पोटगीसाठी अँजेलिनाने पुन्‍हा ब्रॅड पिटला कोर्टाच्‍या पायर्‍या चढायला लावल्‍या आहेत. 

अँजेलिना जोलीने ब्रॅडवर घटस्‍फोटाची याचिका दाखल केल्‍यानंतर मुलांचं संगोपन करण्‍यासाठी पैसे (खर्च) न दिल्‍याचा आरोप केला आहे. परंतु, ब्रॅड पिटने हे आरोप फेटाळले आहेत. पिटच्‍या वकिलांनी बुधवारी कोर्टात सांगितलं की, पिटने अँजेलिनाला आतापर्यंत १३ लाख डॉलरहून अधिक रक्‍कम दिली आहे. त्‍याचबरोबर तिला घर घेण्‍यासाठी ८० लाख डॉलरचं कर्ज घेतलं आहे. 

याआधी मंगळवारी अँजेलिनाच्‍या वकिलाने म्‍हटले होते की, जेव्‍हापासून अँजेलिनाने घटस्‍फोटासाठी कोर्टात केस केल्‍यानंतर तेव्‍हापासून पिटने मुलांच्‍या खर्चाकरिता पैसे देणं बंद केलं आहे. 

अँजेलीना जोली आणि ब्रॅड पिट २००५ मध्‍ये एकत्र होते. ९ वर्षांनंतर २०१४ मध्‍ये दोघे विवाहबंधनात अडकले होते.