वाटचालीबाबत समाधानी

Last Updated: Oct 10 2019 10:40PM
Responsive image

Responsive image

अभिनेत्री बिपाशा बासूने बॉलीवूडमध्ये 18 वर्ष पूर्ण केले आहेत. याबद्धल तिने अभिमान व्यक्त केला आहे. इन्स्टाग्रामवर तिने आपला पहिला चित्रपट ‘अजनबी’चे पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटात तिच्यासमवेत अक्षयकुमार, बॉबी देवोल आणि करिना कपूर होती. अठरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने माझा बॉलीवूडमध्ये प्रवेश झाला आणि चाहत्यांनी मला भरभरून प्रेम दिले.

चित्रपटाच्या वाटचालीबाबत आपण समाधानी असल्याचेही तिने म्हटले आहे. यावेळी ती भावनिक झाली होती. कोणत्याही परिस्थितीत मी सत्याचा मार्ग सोडला नाही आणि म्हणून मला माझ्या कामगिरीवर अभिमान आहे, असे ती म्हणते. या निमित्ताने तिने चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, सहकलाकार, टीम आणि चाहत्यांचे आभार मानले आहे.

- जगदीश काळे