Sun, Feb 17, 2019 22:31होमपेज › Soneri › खऱ्या आयुष्यातही बनला होता 'विकी डोनर'!

खऱ्या आयुष्यातही बनला होता 'विकी डोनर'!

Published On: Sep 14 2018 12:42PM | Last Updated: Sep 14 2018 12:44PMमुंबई: पुढारी ऑनलाईन

आपल्या आवाजाने चाहत्यांवर भुरळ पाडत आयुष्यमान खुरानाने वयाच्या १७ व्या वर्षापासूनच करिअरला सुरुवात केली. मात्र सध्या त्याचे चाहते केवळ त्याच्या आवाजवरच फीदा नसून अभिनय कौशल्यावरदेखील फीदा असेलेले पाहायाला मिळत आहे. पैशांअभावी  ट्रेनमध्ये गाणी गाऊन पैसे कमवणारा तो आज चंदेरी पडद्यावर 'स्टार' बनला आहे. तर जाणून त्याच्या काही खास गोष्टी...

वयाच्या १७व्या वर्षी आयुष्मानने करिअरच्या दृष्टीने वाटचाल केली. सर्वात कमी वयाचा स्पर्धक म्हणून 'पॉपस्टार' या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला.  आयुष्मानने 'विकी डोनर' या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केले. त्याला या चित्रपटा दरम्यान बेस्ट डेब्यू ॲक्टर असा पुरस्कारदेखील मिळाला होता. 

 हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याने 'स्पर्म डोनर'ची भूमिका साकारली होती.  असे म्हटलं जातं की, त्याने २००४ साली खऱ्या आयुष्यातही स्पर्म डोनेट केले आहेत. आयुष्मानने रेडिओवर आरजेचे कामही केले आहे. दिल्लीतील बिग एफएम ९२.७ या रेडिओवर त्याने आरजे म्हणून लोकप्रियता मिळवली होती. टिव्हीवर त्याने सुत्रसंचालकाचेही काम केले आहे. बॉलिवूडमध्ये त्याने पदार्पण केल्यावर त्याचे अभिनय कौशल्यही त्याने सर्वांना दाखवून दिले. त्याला नवोदित अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे.

'विकी डोनर', 'दम लगाके हैश्या', 'बरेली की बर्फी', अशा चित्रपटातून त्याने दमदार अभिनय साकारला आहे. आयुष्मानचे आता 'बधाई हो' आणि 'अंधाधून' हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या दोन्हीही चित्रपटांचे ट्रेलर रिलीज झाले आहेत. 'बधाई हो' हा विनोदी चित्रपट आहे, तर 'अंधाधून' हा रहस्यावर आधारित आहे