Mon, Aug 19, 2019 11:25होमपेज › Solapur › पंढरपुरात मैदानासाठी रस्त्यावरच मांडला खेळ(Video)

पंढरपुरात मैदानासाठी रस्त्यावरच मांडला खेळ(Video)

Published On: Apr 07 2018 12:54PM | Last Updated: Apr 07 2018 12:50PMपंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूर शहरात खेळासाठी मैदानांची निर्मिती करून ते उपलब्‍ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे. या मागणीसाठी शिवक्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी(दि.७) नगरपालिकेसमोरील रस्‍त्यावरच खेड मांडला. क्रिकेट व्‍हॉलीबॉल, बॅडमिंटन असे खेळ रस्‍त्यावर खेळत तरुणांनी अनोखे आंदोलन केले. 

दरम्यान, नगरपालिकेसमोरील रस्ता शहरातील महत्त्‍वाचा रस्ता असल्यामुळे या रस्त्याने चालणारी वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी अन्य मार्गाने वाहतूक वळवून कोंडी टाळली. मात्र, क्रीडा मैदानाच्या मागणीसाठी युवकांनी रस्त्यावरच खेळ मांडल्याने या अनोख्या आंदोलनास नागरिकाचाही उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.