Fri, Apr 26, 2019 10:04होमपेज › Solapur › रड्डे येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू 

रड्डे येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू 

Published On: Jan 12 2018 9:54AM | Last Updated: Jan 12 2018 11:25AM

बुकमार्क करा
रड्डे : वार्ताहर

रड्डे (ता. मंगळवेढा) येथील 20 वर्षीय युवक माणिक नारायण सांगोलकर याचा भोसे येथील हॉटेल बाळकृष्णशेजारी संशयास्पद मृत्यू झाल्याचे, तसेच त्याचा मित्र सचिन हरिदास भगरे हा गंभीर जखमी झाल्याचे शुक्रवारी (दि. 12) पहाटे ही घटना उघडकीस आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रड्डे-भोसे रोडवरील बाळकृष्ण हॉटेलशेजारील विहिरीत माणिक सांगोलकर याचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. तसेच याच विहिरीत पडलेल्या आणि गंभीर जखमी असलेल्या हरिदास भगरे याच्यावर पंढरपूर येथे उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवेढा तालुक्यातील रड्डे-भोसे रोडवर घडली असून, या घटनेची फिर्याद हॉटेलचे मालक माउली भाऊ बंडगर (रा. घेरडी रोड, बंडगर वस्ती, नंदेश्‍वर) यांनी दाखल केली आहे.

 दि. 12 रोजी रात्री दीडच्या सुमारास आमच्या शेतातील विहिरीवर बॅटर्‍यांचा उजेड दिसला. म्हणून काय प्रकार घडला आहे हे पाहण्यासाठी हॉटेलमधील कामगार कुमार सुखदेव शिंदे याला घेऊन जाऊन बॅटरीच्या उजेडात  विहिरीत पाहिले असता एक अनोळखी पुरुष जातीचे मृतदेह दिसून आले. तेथे बाजूला गुंगेवस्ती, भोसे येथील लोकांनी सांगितले की ,विहिरीत पडलेल्या सचिन हरिदास भगरे (वय  21) यास गाडीत घालून खासगी दवाखान्यात  नेले.

मात्र दि.11 रोजी भोसे येथील इंग्लिश स्कूल या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन होते माणिक सांगोलकर हा स्नेहसंमेलन  बघायला गेला होता.स्नेहसंमेलन संपल्यानंतर मित्रासोबत घरी येत असताना रात्री एक ते दीडच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.