Wed, Nov 14, 2018 23:06होमपेज › Solapur › कोर्टी येथे मारहाण करून तरुणाचा खून

कोर्टी येथे मारहाण करून तरुणाचा खून

Published On: Apr 12 2018 1:18AM | Last Updated: Apr 11 2018 10:44PMपंढरपूर : प्रतिनिधी

कोर्टी (ता. पंढरपूर) येथे उसाच्या गाडीवर वडिलांना पाठवत नसल्याचा राग मनात धरून येथील चार संशयित आरोपींना तरुणास लाथा-बुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत तरुण ठार झाल्याची घटना मंगळवार दि. 10 रोजी रात्री घडली आहे. मोहन लक्ष्मण हाके (वय 30) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी चार पैकी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोर्टी येथील ज्ञानेश्‍वर महादेव कारंडे, संतोष विष्णू ढाळे, विष्णू विनोबा ढाळे, गणेश विष्णू ढाळे (सर्व रा. कोर्टी ता. पंढरपूर) यांनी गावातीलच सुनील लक्ष्मण हाके (वय 22) व मोहन हाके यांना मंगळवारी सायंकाळी दमदाटी करीत शिवीगाळ केली. तुमचे वडील लक्ष्मण यांना खरसुंडी (ता. आटपाडी) येथील ऊस गाडीवर कामावर का पाठवत नाही. म्हणत लाथा बुक्क्यांनी दोघा भावांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यात मोहन हाके यास अवघड जागी व मांडीवर जबर मारहाण केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

याबाबत मयत मोहन हाके याचा भाऊ सुनील हाके याने फिर्याद दिली असून पोलिसांनी भादवी कलम 302, 323, 504, 506 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सपोनि गौरीशंकर शिंदे करीत आहेत.

 

Tags : Pandharpur, Pandharpur news, crime, murder,