Fri, Apr 26, 2019 00:13होमपेज › Solapur › मंगळवेढ्यात शेततळ्यात पडून तरूणाचा मृत्यू 

मंगळवेढ्यात शेततळ्यात पडून तरूणाचा मृत्यू 

Published On: Dec 25 2017 7:35AM | Last Updated: Dec 25 2017 7:35AM

बुकमार्क करा

मंगळवेढा : प्रतिनिधी

पाणी आणण्यासाठी गेलेल्‍या सलगर येथील तरूणाचा पाय घसरून शेततळ्यात पडल्‍याने मृत्‍यू झाला. श्रीकांत आप्पासाहेब सुतार (वय, 23) असे मृत्‍यू झालेल्‍या तरूणाचे नाव आहे.  या घटनेची मंगळवेढा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्‍यू अशी नोंद झाली आहे. 

श्रीकांत सुतार हा रविवारी  सलगर शिवारातील रायगोंडा पंडित बिराजदार यांच्या शेतातील शेततळ्यामधील पाणी आणण्यासाठी  गेला होता. त्‍यावेळी त्याचा पाय घसरून पडल्याने तो पाण्यात बुडाल्‍याने त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याची तक्रार ईराण्णा सुतार यांनी पोलिसात दिली आहे.