Fri, Jul 19, 2019 20:17होमपेज › Solapur › बिअरच्या बाटलीने तरुणास मारहाण

बिअरच्या बाटलीने तरुणास मारहाण

Published On: Mar 06 2018 12:09AM | Last Updated: Mar 05 2018 8:40PMसोलापूर : प्रतिनिधी

मित्राची वाट पाहात उभारलेल्या तरुणाच्या  डोक्यात  बिअरच्या बाटलीने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी समर्थ बरडेसह 15 जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सागर लक्ष्मण पाटील (वय 28, रा. गायत्रीनगर, वसंतविहार, सोलापूर) याच्या फिर्यादीवरून समर्थ बरडे, धनराज चौगुले, धवल चौगुले, योगीराज चौगुले, ओंकार रणदिवे, अशितोष नरोटे, अजय अणूर, कुंदन पवार (रा. सोलापूर) आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर पाटील हा शनिवारी रात्री आठच्या सुमारास अवंतीनगर रिक्षा स्टॉप येथे मित्राची वाट पाहात होता. त्यावेळी समर्थ बरडे व त्याचे साथीदार हे  कारमधून तसेच 4 ते 5 दुचाकीवरून आले. त्यांनी सागर पाटील यास तू कोण आहे, येथे का  थांबला असे म्हणून शिवीगाळ करून  मारहाण  करण्यास सुरुवात केली. यावेळी पाटील याच्या अंगावरील  शर्ट  फाडून त्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली तसेच इतरांनी हाताने, लाथाबुुक्क्याने, बांबूने व दगडाने मारहाण करून जखमी केले आणि पाटील याच्या खिशातील 200 ते 250 रुपये काढून घेतले म्हणून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक दिवसे तपास करीत आहेत.

तरुणास मारहाण करणार्‍या 8 जणांवर गुन्हा दाखलधमकी देऊन तरुणास मारहाण करणार्‍या 8 आठजणांविरुद्ध  फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी आप्पाजी कोडगे (वय 25, रा. हांडे प्लॉट, हवंजाळ वाडा) याच्या फिर्यादीवरून सागर पाटील, सूरज पाटील, सोनू कदम, महेश केत व इतर चारजण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी रात्री जुना पुना नाका येथे सागर पाटील व त्याच्या साथीदारांनी संभाजी कोडगे यास येता जाता काय पाहतो, तुला मस्ती आली का असे म्हणून धमकी देऊन मारहाण करून जखमी केले म्हणून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक देशमाने तपास करीत आहेत.