Thu, Sep 19, 2019 03:26होमपेज › Solapur › आढीव येथे तरुणाचा धारदार शस्त्राने खून

आढीव येथे तरुणाचा धारदार शस्त्राने खून

Published On: Jun 13 2019 1:37AM | Last Updated: Jun 12 2019 11:12PM
पंढरपर :  प्रतिनिधी

आढीव (ता. पंढरपूर) येथे एका व्यसनाधीन तरुणाचा धारदार शस्त्राने अज्ञाताने सपासप वार करून खून केल्यानंतर त्याला त्याच्या घरात आणून टाकल्याची घटना मंगळवारी दि. 11 रोजी घडली असून ही घटना दि. 12 रोजी दुपारी उघडकीस आली आहे.  योगेश धनाजी दरगुडे (वय 28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, योगेश धनाजी दरगुडे हा आई-वडिलांपासून वेगळा रहात होता. त्याचे पहिले लग्न झाले असून योगेशला दारूचे व्यसन असल्याने पहिली पत्नी त्याला सोडून गेली असल्याने त्याने दुसरे लग्‍न केले आहे. मात्र तो व्यसनी असल्याने पत्नी व आई-वडिलांना पैसे व जमीन, घर नावावर करून दे म्हणून सतत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत होता. दरम्यान दि. 12 रोजी आढीव विसावा येथे योगेश धनाजी दरगुडे याच्या चुलत भावाचे लग्‍न होते. या लग्‍नात योगेश दारू पिऊन धिंगाणा घालेल म्हणून त्याच्या आई-वडिलांना लग्‍नकार्यास न येण्याचा सल्ला भाऊ तानाजी दरगुडे यांनी दिला होता. 

भाऊ तानाजी दरगुडे यांच्या जावायाची सोन्याची अंगठी योगेशने काढून घेतली होती. ती परत देण्यास तो तयार नव्हता. याची माहिती योगेशचे वडिल धनाजी यांना जावाई तुकाराम तांबवे यांनीदिली व माझी अंगठी भरुन द्या अशी तंबी दिली. 

दरम्यान दि. 11 रोजी दुपारी 4 वाजता योगेश धनाजी दरगुडे याचा कोणीतरी अज्ञात कारणावरुन धारदार शस्त्राने हातापायावर मारहाण करुन त्याचा खून केला व त्याचे प्रेत आढीव विसावा विठ्ठल वाडी येथील खोलीत आणून टाकलची तक्रार धनाजी दरगुडे यांनी तालूका पोलीसात दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पो.नि. धनंजय जाधव करत आहेत. तपासाकरीता दोन पथके तैनात करण्यात आली आहेत.