Wed, Apr 24, 2019 22:00होमपेज › Solapur › सोलापूर : मजुराची गळफास घेऊन आत्‍महत्या

सोलापूर : मजुराची गळफास घेऊन आत्‍महत्या

Published On: Jul 08 2018 11:40AM | Last Updated: Jul 08 2018 11:36AMकरकंब (वार्ताहर)

पंढरपूर तालुक्यातील जळोली येथील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणार्‍या एकाने गळफास घेऊत आत्‍महत्या केली. सुरेश मच्‍छिंद्र काळे असे या ५२ वर्षीय व्यक्‍तीचे नाव आहे. शनिवारी रात्री घरातील सर्वजण झोपल्यानंतर राहत्या घरात पत्र्याच्या लोखंडी अँगलला सुरेश यांनी दोरीने गळफास घेतला. आत्‍महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

सुरेश यांच्या कुटुंबीयांना रात्री २ च्या सुमारास याबाबत समजले तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. सुरेश हे जळोलीत मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. या घटनेबाबत मृत सुरेश यांचा मुलगा राहुल सुरेश काळे (वय - २६)  रा. जळोली ता. पंढरपूर याने करकंब पोलिस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी  अकस्‍मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सपोनि  उमेश धुमाळ  यांच्या आदेशाने पोना दादासाहेब सूळ हे करीत आहेत.