Sat, Apr 20, 2019 16:31होमपेज › Solapur › नवरा व सवतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

नवरा व सवतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Published On: Aug 05 2018 1:34AM | Last Updated: Aug 04 2018 10:27PMसोलापूर : प्रतिनिधी

नवर्‍याच्या शिवीगाळ, मारहाणीसह सवतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याप्रकरणी पती आणि सवतीवर सदर बझार पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला. 

मृत महिलेची नणंद सुनीता मंजू श्रीराम (वय 25, कुमठा नाका) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पती परशूराम भीमण्णा मुंगली (वय 40) आणि सवत पुष्पा परशूराम मुंगली (वय 35, रा. मौलाली चौक) या दोघांवर गुन्हा दाखल झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. दुर्गमा परशूराम मुंगली (वय 35, रा. पंचशीलनगर, कुमठा नाका) असे मृत महिलेचे नाव आहे. दहा-बारा वर्षांपासून शारीरिक व मानसिक त्रास देऊन आरोपींनी मिळून त्रास दिला. घरखर्चासाठी पैसे मागितल्यावर तुला पैसे देत नाही, तुला नांदवत नाही, तू माहेरीच राहा असे म्हणून पती त्रास देत होता. फिर्यादीची नणंद व नणंदेची मुलगी सोनी हे दोघे जात असताना तेथे पती परशूरामने दुर्गम्मास मी तुला नांदविणार नाही, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण करुन निघून गेला. मुलगी सोनी ही घाबरुन घरी आली असता नवर्‍याच्या व सवतीच्या त्रासाला कंटाळून फिर्यादीच्या नणंद दुर्गम्माने विषारी औषध घेतले. तिला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत झाली.