Tue, Apr 23, 2019 13:48होमपेज › Solapur › महिलांमध्येही देशाची अखंडता टिकवण्याची ताकद : आ. शिंदे

महिलांमध्येही देशाची अखंडता टिकवण्याची ताकद : आ. शिंदे

Published On: Mar 11 2018 11:24PM | Last Updated: Mar 11 2018 10:43PMसोलापूर : प्रतिनिधी
महिला आज सर्वच क्षेत्रात पुढे येत आहेत. पत्रकारितेमध्येही महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. कोणत्याही क्षेत्रात महिलांनी आघाडी घेतली की सर्वांना एक प्रेरणा, ऊर्जा मिळते. महिलांची कणखरता समाज तसेच देशासाठी उपयुक्त आहे.  महिलांमध्येही देशाची अखंडता टिकवण्याची ताकद आहे, असे प्रतिपादन आ. प्रणिती शिंदे यांनी केले.महिला दिनानिमित्त श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने महिला पत्रकारांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी अध्यक्षस्थानावरून आ. शिंदे बोलत होत्या. यावेळी अस्मिता चॅनेलच्या प्रमुख अस्मिता गायकवाड, स्वरांजली चॅनेलच्या संपादिका सुचित्रा थळंगे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस उमेश कदम उपस्थित होते.

आ. शिंदे पुढे म्हणाल्या की, राजकारणामध्ये काम करताना कधीतरीच कौतूक होते. मात्र पत्रकारितेमध्ये काम करताना रोज कौतूक होत असते. पत्रकारांच्या बातम्यांमुळे रोज किमान 100 जणांमध्ये तरी फरक पडत असतो. वास्तविक पाहता आमदार, खासदारांपेक्षाही जास्त काम पत्रकारांचे असते. अशा  क्षेत्रातही महिलांनी घर सांभाळुन आघाडी घेतली, हे कौतुकास्पद आहे. स्त्रियांची प्रगती होत असली तरी अजून पुरूषांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. राजकारणात आजही महिलांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची मानसिकता पुरूषांमध्ये नाही. यातून महिलांना एक संघर्ष करूनच आपली वाट काढावी लागते, अशी खंत आ. शिंदे यांनी यावेळी बोलून दाखवली. प्रारंभी अस्मिता गायकवाड, सुचित्रा थळंगे, अश्‍विनी तडवळकर, प्रमिला चोरगी, सुनिता कुलकर्णी, माधवी कुलकर्णी, पल्लवी गंभिरे, रूपाली वाडेकर, अपर्णा लोला, मृणाल निपुणगे, श्रद्धा कामत, प्रणाली कापसे, श्रृती कुलकर्णी, राणी भोसले, अरूंधती शेटे, अश्‍लेषा निपुणगे, अश्‍विनी इंगळे, रसिका भट, रामेश्‍वरी कोकणे, उज्ज्वला महंशी, श्रद्धा कुलकर्णी, श्रृती बोगा, रेखा सरवदे, रेणुका बुधाराम, सविता झुंजा, लता गाजूल, नागमणी भंडारी, पल्लवी पवार, शिवानी पवार, विजयश्री गुळवे आदींचा समावेश होता. सूत्रसंचालन वसंत राजपुरे यांनी केले.