Thu, Apr 18, 2019 16:04होमपेज › Solapur › बक्षीहिप्परगा येथे महिलेचा खून, आरोपी अटकेत

बक्षीहिप्परगा येथे महिलेचा खून, आरोपी अटकेत

Published On: Dec 07 2017 12:29PM | Last Updated: Dec 07 2017 12:29PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षिहिप्परगे गावात महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सुनीता कांबळे (वय, ४२) अस खून झालेल्‍या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांनी सिद्धाराम गायकवाड (वय, ६२) यास चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, संशयित आरोपी हा महिलेचा व्याही असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. 

तालुका पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे.