Sun, Jan 20, 2019 16:48होमपेज › Solapur › सोलापुरात भावकीच्या वादातून महिलेचा खून 

सोलापुरात भावकीच्या वादातून महिलेचा खून 

Published On: Jan 29 2018 12:45PM | Last Updated: Jan 29 2018 12:45PMमाढा : वार्ताहर

महातपूर (ता माढा) येथे शेतजमिनीत जाण्या-येण्याच्या कारणावरून लाथाबुक्यांनी व दगडाने मारहाण करून महिलेचा खून केल्‍याची घटना समोर आली आहे. या बाबत पाच जणांवर माढा पोलिसात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

निर्मला भूपाल वसगडेकर (वय, ४०) असे खून झालेल्‍या महिलेचे नाव आहे. राजेंद्र देवेंद्र वसगडेकर, युवराज राजेंद्र वसगडेकर, छाया राजेंद्र वसगडेकर, सुकुमार बाबूराव कोटावळे, समाधान महावीर वारे अशी खून केलेल्‍या संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत प्रशांत भूपाल वसगडेकर याने माढा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

महातपूर येथील रहिवासी असलेल्या वसगडेकर कुटुंबाची शेजारील निमगाव शिवारात शेती आहे. शेतात जाणे येण्याच्या कारणावरून निर्मला व आरोपी  वसगडेकर या कुंटुंबात गेल्या दीड महिन्यापासून वाद निर्माण झाला होता. यावरुनच रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास महातपूर येथील महादेव मंदिरासमोरील कट्टयाजवळ झालेल्या वादात आरोपींनी लाथाबुक्यांनी व दगडाने मारहाण करून निर्मला हीस जीवे मारल्याचे, फिर्यादीत नमूद केले आहे. घटनेचा अधिक तपाससहायक पोलिस निरीक्षकअतुल भोस करीत आहेत.