Wed, Mar 27, 2019 00:36होमपेज › Solapur › अमेरिकेत विवाहितेचा छळ; पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

अमेरिकेत विवाहितेचा छळ; पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

Published On: Jan 25 2018 10:28PM | Last Updated: Jan 25 2018 10:08PMसोलापूर : प्रतिनिधी

लग्‍नात मानपान न केल्यावरून विवाहितेचा सोलापूर, नागपूर आणि अमेरिकेमध्ये शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुशल मनोहर औरंगाबादकर, मनोहर औरंगाबादकर, माया मनोहर औरंगाबादकर, कन्हैय्या मनोहर औरंगाबादकर (रा. मेडिकल हौसिंग सोसायटी, विजापूर रोड, सोलापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पूजा कुशल औरंगाबादकर (वय 26, रा. मेडिकल हौसिंग सोसायटी, विजापूर रोड, सोलापूर, गिनसिटी गर्व्हमेंट ऑफिस हौसिंग सोसायटी, सोलापूर) या विवाहितेने फिर्याद दाखल केली आहे.

पूजा व कुशल यांचा विवाह  2015 मध्ये झाला. त्यानंतर 3 ते 4 दिवसांनंतरच पती कुशल व त्याच्या घरातील लोकांनी पूजा हिच्या लग्‍नात मानपान दिला नाही, मागितलेल्या वस्तू दिल्या नाहीत, या कारणावरून पूजाला सोलापूर येथील घरात तसेच अमेरिकेत सिएटल  येथील  घरी मारहाण करून छळ केला. सोलापूर, नागपूर  येथे छळ करून अमेरिकेच्या कायद्यानुसार पूजाला डिव्होर्स दिला म्हणून विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक  पोलिस निरीक्षक मोहिते तपास करीत आहेत.