होमपेज › Solapur › नमाज पडत नसल्यावरून विवाहितेचा छळ

नमाज पडत नसल्यावरून विवाहितेचा छळ

Published On: Jan 25 2018 10:28PM | Last Updated: Jan 25 2018 10:00PMसोलापूर : 

नमाज पडत नाही म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणार्‍या पतीसह सहाजणांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयेशा अयाज नेचेबंद (वय 21, शानदार चौक, सोलापूर) या विवाहितेच्या फिर्यादीवरुन पती अयाज अब्बास नेचेबंद (वय 24), सासरे अब्बासस हुसेनसाब नेचेबंद, सासू बिल्कीस अब्बास नेचेबंद, फय्याज अब्बास नेचेंबद, सना नजीर शेख, नूजत नबीलाल डोंगरी (रा. शास्त्रीनगर, सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जून 2017 पासून अयाज नेचेबंद याच्या घरातील लोकांकडून त्याची पत्नी आयेशा हिचा तुझे डोके वाकडे आहे, नाक बरोबर नाही, नमाज पढत नाही असे म्हणून तसेच बंद पडलेली रिक्षा चालू करण्यासाठी तिने माहेराहून 50 हजार रुपये आणावेत म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला म्हणून सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक कलाल तपास करीत आहेत.