Fri, Apr 19, 2019 08:10होमपेज › Solapur › सीना नदी पार करताना महिलेचा बुडून मृत्यू

सीना नदी पार करताना महिलेचा बुडून मृत्यू

Published On: Feb 15 2018 10:31PM | Last Updated: Feb 15 2018 8:58PMकरमाळा : तालुका प्रतिनिधी

शेतात पाणी देण्यासाठी सिना नदीच्या पात्रातून रबरी ट्यूबच्या सहाय्याने जाणार्‍या शेतकरी महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. लता मनोहर नगरे (वय 38य रा. करंजे) असे मृत झालेल्याचे नाव आहे. हा प्रकार गुरुवारी दुपारी झाला आहे. याची फिर्याद सोलापूर मध्यवर्ती बँकेचे वांगी नंबर 3 येथील शाखेतील कर्मचारी असणारे व मृत महिलेचे पती मनोहर दशरथ नगरे (44, रा. करंजे) यांनी दिली आहे.

नगरे कुटुंबीयाची शेतजमीन सिना पलीकडील दिलमेश्‍वर शिवारात आहे. या शेतात जाण्यासाठी सिनापात्रातून जावे लागते. यंदा मुबलक पाऊस झाल्याने सिना नदीत मुबलक पाणी आहे.त्यामुळे या पाण्यातुनच दिलमेश्वरला जवळचा मार्ग म्हणून पुल नसल्याने हवेच्या ट्युबवर बसुन अथवा पोहत जाऊन हे अंतर पार करावे लागते.  त्यामुळे नेहमीप्रमाणे दुपारी 12.20 वाजण्याच्या वेळी हवेच्या ट्युबच्या सहाय्याने मयत लता नगरे या चालल्या होत्या. मात्र थोड्या अंतरावर त्या गेल्या असता त्या ट्युबवरून पाण्यात पडल्या असता त्या पाण्यात बुडाल्या .यावेळी  यावेळी मयताचा पुतण्या विजय धोडिंबा नगरे यानी पाण्यातुन बाहेर काढले.व  त्याना उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी आणले आसता त्याचा उपचारापुर्वी त्या मयत झाल्या होत्या.याबाबत पोलिसानी अकस्मात मृत्युची नोंद पोलीसात दाखल करण्यात आली आहे.मयत महिलेचे शवविच्छेदन करून करंजे येथे उशीरा रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.विवाहित महिलेच्या अकस्मात मृत्युने करंजे व दिलमेश्वर शिवारात हळहळ व्यक्त होत आहे. या मयताचा तपास हवालदार अनिल निबांळकर हे करीत आहेत.