Fri, Sep 21, 2018 07:49होमपेज › Solapur › सोलापूर सिना नदीत महिला बुडाली 

सोलापूर सिना नदीत महिला बुडाली 

Published On: May 24 2018 11:26AM | Last Updated: May 24 2018 11:26AMमाढा (जि. सोलापूर) : वार्ताहर

दारफळ (सिना,  ता. माढा )येथे सिना नदीपात्रात महिला बुडाल्याची घटना गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली. उज्ज्वला मारुती खोटे (वय, ४०) असे बुडालेल्या महिलेचे नाव आहे. उज्ज्वला ही सकाळी अंघोळीला गेली असता पाय घसरून ती नदीत पडली. पोहता येत नसल्‍याने ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. 

घटनास्थळाला माढ्याचे तहसीलदार एम. पी. मोरे, सपोनि अतुल भोस यांनी भेट दिली. बुडालेल्या महिलेचे नदीपात्रात शोधकार्य सुरु आहे.