Mon, Dec 17, 2018 15:02होमपेज › Solapur › सोलापूर : दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला ठार

सोलापूर : दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला ठार

Published On: Feb 09 2018 12:15PM | Last Updated: Feb 09 2018 12:15PMमंगळवेढा : पुढारी ऑनलाईन

तालुक्याच्या दक्षिण भागात सीमावर्ती ठिकाणी असलेल्या सोडडी येथे गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. गळ्यातील सोन्याचे दागीने हिसकावून घेण्यास विरोध केला म्हणून कस्तुरी रामण्णा बिराजदार (वय ६०) या महिलेचा खून केला. तर मलकाप्पा रेवगोंडा बिराजदार (वय ६०) हे मारहाणीत गंभीर जखमी आहेत.

दरोडेखोरांनी अन्य दोन ठिकाणीही घरफोडी केली असून या प्रकरणाने परिसरात घबराट पसरली आहे. जखमींना उपचारासाठी जत येथील रुग्‍णालयात नेण्यात आले आहे. 

आज सकाळी घटनास्‍थळी पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी भेट दिली. त्यानंतर जिल्‍हा पोलिस प्रमुख वीरेश प्रभू हेही घटनास्‍थळी दाखल झाले आहेत. या गावातील बहुसंख्य लोक उपजीविकेसाठी सांगली व कोल्हापूर भागात ऊसतोडणीसाठी गेले असून गावात वयोवृध्द महिला आहेत. हे गाव कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवर असल्याने दरोडेखोरांना चोरी करुन कर्नाटकाचा आसरा घेणे शक्य होते. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत