Thu, Jun 27, 2019 14:00होमपेज › Solapur › लांडग्याच्या हल्ल्यात 12 शेळ्या ठार

लांडग्याच्या हल्ल्यात 12 शेळ्या ठार

Published On: Mar 07 2018 9:35AM | Last Updated: Mar 06 2018 9:12PMसांगोला : तालुका प्रतिनिधी

चार लांडग्यांनी गोट्यात घुसून केलेल्या हल्ल्यात 12 शेळ्या ठार  केल्या. त्यामुळे सुमारे 60 ते 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.  ही घटना मंगळवारी पहाटे मांजरी (ता. सांगोला) अंतर्गत मुजावर वस्ती येथे घडली आहे. मांजरी अंतर्गत मुजावर वस्ती येथील दिलावर मुजावर यांच्या घरासमोरील गोट्यात सोमवारी नेहमी प्रमाणे सायं. 6 च्या सुमारास शेळ्या कोंडल्या होत्या. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास शेळ्या ओरडू लागल्याने दिलावर मुजावर यांनी घरा बाहेर येऊन पाहिले असता गोट्यात चार लांडगे दिसून आले. यावेळी त्यांनी आरडाओरड करताच लांडग्यांनी एका शेळीसह तेथून धूम ठोकली. मात्र, लांडग्यांनी चार शेळ्या, 

चार कोकरू, तीन बोकड जीवे ठार मारले.

दिलावर मुजावर यांनी वन विभाग, पशू वैद्यकीय विभाग, गावकामगार तलाठी यांना या घटनेची माहिती दिली. तालुका पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सुर्वे, वनअधिकारी डी. बी. शिदोडकर, वनरक्षक ए. के. करांडे, गावकामगार तलाठी सी.पी. पिसे, यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मृत शेळ्यांचा  पंचनामा करून जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य नारायण जगताप, पोलिस पाटील किशोर जगताप, माजी सरपंच जयवंतराव जगताप यांनी भेट देऊन मुजावर कुटुंबीयांना धीर दिला. मुजावर कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी अशी मागणी पशुपालकातून होत आहे.