होमपेज › Solapur › सोलापूर : साक्षीदारानेच लगावली वकिलाच्या कानशिलात

साक्षीदारानेच लगावली वकिलाच्या कानशिलात

Published On: Jan 11 2018 1:41PM | Last Updated: Jan 11 2018 1:41PM

बुकमार्क करा
सोलापूर : पुढारी ऑनलाईन

सोलापूर जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांवरील हल्ल्यांच्या घटना ताज्या असतानाच बुधवारी दुपारी चहा-पाणी न दिल्याच्या रागातून पंच-साक्षीदाराने चक्क वृध्द वकिलाच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली. याबाबत जेलरोड पोलिस  ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतुल मारुती साठे (वय ४५, रा. माजी सैनिक नगर, विजापूर रोड, सोलापूर) असे मारहाण करणार्‍या पंच-साक्षीदाराचे नाव आहे. याबाबत ईस्माईल मौलासाब कमलीवाले (वय ७२, रा. व्यंकटेश नगर, महिला हॉस्पीटलमागे, होटगी रोड, सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. कमलीवाले हे सेवानिवृत्त झाल्यानंतर जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करतात.