Thu, Jun 27, 2019 14:17होमपेज › Solapur › सोलापूर : तो खून पत्‍नीच्या अनैतिक संबंधातून, संशयितांकडून कबुली

सोलापूर : तो खून पत्‍नीच्या अनैतिक संबंधातून, संशयितांकडून कबुली

Published On: Aug 20 2018 10:30PM | Last Updated: Aug 20 2018 10:30PMरड्डे : वार्ताहर

मंगळवेढा तालुक्यातील जुनोनी शिवारात रविवारी दि. १९ ऑगस्ट रोजी कुंडलिक एकनाथ मासाळ (वय ३८, रा. गोणेवाडी, ता.मंगळवेढा) यांच्या शेतातील विहीर व बोअरमध्ये एका अज्ञाताचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली होती. यानंतर कुंडलिक मासाळ यांनी सदर प्रकरणाची माहिती मंगळवेढा पोलिसांना दिल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे, पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे, सपोनि महेश विधाते, उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी, सपोनि मारकड, यांनी सदर घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन तपासाची चक्रे जलद फिरवत अवघ्या चोवीस तासाच्या आत तीन आरोपींना अटक केली आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, भीमराव सुभान हातागळे उर्फ मस्के (मुळ रा. गोविंदवाडी ता. गेवराई, जि. बीड सध्या रा. खुपसंगी ता. मंगळवेढा) व पत्नी वंदना हे गेल्या अनेक वर्षांपासून खुपसंगी येथे राहत आहेत. मृत भीमराव सुभान हातागळे यांची पत्नी वंदना व गावातीलच विष्णू बाबू आलदर (वय २५ रा. आलदरवस्ती खुपसंगी ता. मंगळवेढा) याच्याबरोबर अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधातूनच विष्णू बाबू आलदर, अतुल जगन्नाथ सावंत (वय २६ रा. डोंगरगाव ता. मंगळवेढा) व दत्तात्रय म्हाकु वळकुंडे (वय ४६ रा. वाकीघेरडी ता. सांगोला) या तिघांनी मिळून भीमराव याला गोणेवाडी, जुनोनी व खुपसंगी या तीन गावाच्या हद्दीवर गळा चिरून, तुकडे करून कुंडलिक एकनाथ मासाळ यांच्या शेतातील बोअर मध्ये टाकले. उर्वरित शरीरिराचा भाग शेतामधील विहिरीत टाकले होते. 

सदर घटनेतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि महेश विधाते करीत आहेत. या तपासकामी पोलीस हवालदार दत्तात्रय तोंडले, अनिल दाते, आलमगीर लतिफ, सुहास देशमुख ,अमर सुरवसे, सिद्धनाथ मोरे,गणेश सोलंकर,अजित मिसाळ यांनी सहकार्य केले.