Tue, Jan 22, 2019 18:22होमपेज › Solapur › पत्नी आणि मुलीची हत्या करुन पतीची आत्महत्या

पत्नी आणि मुलीची हत्या करुन पतीची आत्महत्या

Published On: May 01 2018 9:58PM | Last Updated: May 01 2018 9:58PMसोलापूर : प्रतिनिधी

अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव देशमुख गावात पतीने आपल्या पत्नीसह मुलीची गळा दाबून हत्या करुन स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सतीश बंदिछोडे असे या हत्या करणाऱ्या पतीचे नाव असून पत्नी अंदवा (वय २५ ) आणि वेदिका (वय ३) अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

सतीश हा पुण्यात नोकरीसाठी राहत होता. काल रात्री तो पुण्याहून आपल्या पत्नी आणि मुलीला घेऊन देवीच्या दर्शनासाठी शेतात गेला. त्यानंतर त्याने तिथेच पत्नी आणि मुलीचा गळा दाबून खून केला आणि स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी घरघुती वादातून ही हत्या झाल्याची चर्चा आहे. अक्कलकोट पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अधिकचा तपास करीत आहेत, मात्र या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.