Thu, Apr 25, 2019 05:34होमपेज › Solapur › सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा : ३३ गावांनी घेतले प्रशिक्षण

सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा : ३३ गावांनी घेतले प्रशिक्षण

Published On: Feb 25 2018 3:29PM | Last Updated: Feb 25 2018 3:32PMवैराग : आनंदकुमार डुरे 
पाणी फांऊंडेशन यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ' सत्यमेव जयते ' वॉटरकप स्पर्धा -२०१८ स्पर्धेसाठी बार्शी तालुक्यातील ३३ गावांनी प्रशिक्षण घेतले असून प्रत्यक्ष कामाला सुद्धा सुरुवात केली आहे .

सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांची यास्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे .यात उत्तर सोलापूर , सांगोला , मंगळवेढा , करमाळा , माढा व बार्शी तालुक्यांचा समावेश आहे .या समावेश करण्यात आलेल्या तालुक्यातील गावांचे प्रशिक्षण विविध ठिकाणी सुरू करण्यात आले आहे . तर बार्शी तालुक्यातील सहभागी गावांचे प्रशिक्षण १ फेब्रुवारी पासून सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील किरकसाल या गावी सुरू करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ज्या तालुक्यांची निवड या वॉटरकप स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्यातील काही तालुक्यांनी प्रशिक्षण घेतले आहे तर राहिलेले तालुके आगामी काळात घेतील.

बार्शी तालुक्यातील ४९ गावे यास्पर्धेत सहभागी झाली होती .त्यापैकी आत्ता पर्यंत ३३ गावांनी पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षण घेतले आहे .याप्रशिक्षणात तांत्रिक प्रशिक्षक ऋषिकेश तांबिले व रविंद्र पोमने तर सामाजिक प्रशिक्षिका सत्यशीला भंडारे प्रशिक्षण देत आहेत . याप्रशिक्षणामध्ये जल संधारण व मन संधारण, पाणलोट विकासाचे तंत्र , लोकसहभागातून गावाचा विकास कसा साधता येईल याबाबत सहभागी प्रशिक्षणनार्थीना प्रशिक्षण देण्यात येत आहे. बार्शी तालुक्यात नितीन आतकरे व अब्दुल शेख हे पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक म्हणून काम करीत आहेत.


सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत नेमक काय होणार 
गावातील घराच्या संख्येच्या नव्वद टक्के नांदेड पॅटर्न शोषखड्डे , लोकसंख्येच्या दुप्पट संख्ये इतकी नर्सरी तयार करणे , माती परीक्षण ,जल बचत तंत्रज्ञान , श्रमदानातून काम करणे , पानलोटाचे जुने स्ट्रक्चर दुरुस्त करणे अथवा नविन बांधणे , मूलस्थानी जलसंधारण आणि विहीर व बोअरवेल पुरणभरण आदी विकास कामावर भर देण्यात येणार आहे .