Sat, Jul 20, 2019 10:44होमपेज › Solapur › जलतरण तलावाचे आज लोकार्पण

जलतरण तलावाचे आज लोकार्पण

Published On: Apr 08 2018 10:19PM | Last Updated: Apr 08 2018 9:24PMसोलापूर : प्रतिनिधी

विजापूर रोडवरील सुंदरम नगरात जिल्हा क्रीडा संकुल समितीच्यावतीने साकारण्यात आलेल्या जलतरण तलावाचा लोकार्पण सोहळा सोमवार, 9 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पाच नद्यांचे जलपूजन करून होणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी दिली.

या कार्यक्रमास महापौर शोभा बनशेट्टी, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, खा. शरद बनसोडे यांच्यासह खासदार रवींद्र गायकवाड तसेच प्रशांत परिचारक, बबनदादा शिंदे, भारत भालके, नारायण पाटील, रामहरी रुपनवर, गणपतराव देशमुख, सिद्धाराम म्हेत्रे, प्रणिती शिंदे, दत्तात्रय सावंत, दिलीप सोपल, हनुमंत डोळस, रमेश कदम हे आमदारद्वय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, महापालिका आयुक्‍त डॉ. अविनाश ढाकणे, पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे, जिल्हाधिकारी तथा क्रीडा समितीचे अध्यक्ष रामचंद्र शिंदे, क्रीडा व युवक सेवा पुणे विभागाचे संचालक विजय संतान आणि अभियंता व्ही. एच. मोरे यांची उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून जलतरणामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारलेले सोलापुरातील जलतरणपटू आणि नुकतेच शिवछत्रपती पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. 

तलावात सुमारे 38 लाख लिटर पाणी

जलतरण तलावासाठी सुमारे 2 कोटी 60 लाख रुपये इतका खर्च झाला आहे. यामध्ये टँक, फिटर प्लांट, मुला-मुलींचे चेंजिंग रूम, बेबी टँकचा समावेश आहे. डायव्हिंगच्या सुविधांसह तलाव परिपूर्ण आहे. तलावाची खोली 4 ते 16 फूट इतकी आहे. 21 बाय 50 मीटरचा तलाव असून त्यातील पाण्याची क्षमता 38 लाख लिटर आहे. याशिवाय दोन लाख लिटर अतिरिक्त पाणी साठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पाणी शुद्धीकरणासाठी एकूण 4 फिल्टर प्लांट बसविण्यात आले आहेत, असे क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी सांगितले.