Thu, Jul 18, 2019 01:01होमपेज › Solapur › सोलापूरकरांसाठी खुशखबर, उजनीच्या विसर्गात वाढ

सोलापूरकरांसाठी खुशखबर, उजनीच्या विसर्गात वाढ

Published On: Jul 11 2018 5:29PM | Last Updated: Jul 11 2018 5:29PMबेंबळे (जि. सोलापूर) : वार्ताहार

संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागुन राहिलेल्या उजनी धरणाच्या पाणिसाठ्यात हळुहळु वाढ होवू लागली आहे. उजनी धरण आणि त्यावरील 19 धरणांच्या पाणलोट  क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे  उजनी धरणाच्याकडे येणाऱ्या विसर्गात  हळुहळु वाढत होत आहे. आतापर्यंत बंडगार्डन येथून 1458  विसर्ग येत होता  आजपासून दौंड येथून 6175 क्युसेकने विसर्ग येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढहोवू लागली आहे. गेल्या 24 तासात  पाणीसाठ्यात 1.41  टीएमसी  वाढ झाली आहे.

उत्तम पाणी नियोजन केल्यामुळे धरणसाठा समाधानकारक 

उजनी धरण 15 आँक्टोबर 2017 रोजी 111 टक्‍के भरले होते.123 टीएमसी पाणीसाठा झाला होता. असे दरवर्षी वगळता उजनी भरत असते. पण नेहमी 1 मेच्या आधीच उजनी धरण मायनस पातळीत जाते. पण यावर्षी उजनी धरण जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता शिवाजी चौगुले यांच्या योग्य नियोजनामुळे उजनीतील पाणी सर्वांना योग्य प्रमाणात व योग्यवेळी मिळाल्यामुळे उजनी धरण  जवळपास एक महिना उशिरा मायनसमध्ये आले. सध्या उजनी धरणात येणाऱ्या विसर्गामुळे  मृतसाठ्यातून उपयुक्त साठ्यात लवकरच येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

उजनीची पाणीपातळी पुढीलप्रमाणे 

एकूण पाणीसाठा...489.990 मी. 
एकूण पाणीपातळी ..1605.90 दलघमी
उपयुक्त पाणीपातळी ..वजा 196.91 दलघमी 
टक्केवारी ...वजा 12.98%

विसर्ग ...
बंडगार्डन 3819 क्युसेक 
दौंड....6175 क्युसेक ... 
पाणीसाठा टीएमसी मध्ये...
एकूण पाणीसाठा ..56.70 टीएमसी 
उपयुक्त पाणीसाठा..वजा 6.95 टीएमसी