Wed, Jun 26, 2019 17:47होमपेज › Solapur › अधिकार्‍यांना विकतचे; जनतेचा घसा मात्र कोरडा

अधिकार्‍यांना विकतचे; जनतेचा घसा मात्र कोरडा

Published On: Mar 22 2018 10:54PM | Last Updated: Mar 22 2018 10:41PMसोलापूर : महेश पांढरे  

संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासाठी आणि मूलभूत सेवासुविधांसह हक्‍क व अधिकार मिळवून देण्यासाठी तत्पर असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयत ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर वॉटर फिल्टर बंद पडले आहेत. त्यामुळे अधिकार्‍यांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे, तर सर्वसामान्यांच्या घशाला मात्र कोरड कायमच राहिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कर्मचार्‍यांसह बाहेर येणार्‍या लोकांची गर्दी मोठी असते. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे आलेला प्रत्येक व्यक्‍ती प्यायला पाणी आहे का, अशी विचारणा करतो. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांसह अधिकार्‍यांना या प्रश्‍नी गप्पच राहावे लागते. त्यामुळे कोणतेच उत्तर मिळत नसल्याने समोरील व्यक्ती नाराजी व्यक्त करत असताना ही संबंधित अधिकार्‍याला ते ऐकून घेण्याची वेळ आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला बसण्यासाठी जागा आणि पिण्यासाठी पाण्याची सोय असावी असा शासनाचा आदेश असताना जिल्हाधिकारी कार्यालयात याचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. या आदेशानुसार पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांत वॉटर फिल्टर बसविण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी ते सध्या बंद असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे वॉटर फिल्टर असून ते बंद असल्याने लोकांच्या घशाला मात्र कोरड कायमच राहात आहे. सेतू कार्यालयात सर्वसामान्य लोकांची वर्दळ मोठी असते. त्याठिकाणी वॉटर फिल्टर असणे अत्यंत गरजेचे असताना  त्याठिकाणी ते कोठेच बसविल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आलेल्या लोकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. 
त्यासाठी तात्काळ हे वॉटर फिल्टर दुरुस्त करुन घ्यावेत, अशी मागणी आता सर्वसामान्य लोकांनी लावून धरली आहे.

Tags :  solapur Collector Office, water filter