Sun, Nov 18, 2018 13:27होमपेज › Solapur › पंढरपुरात वडार समाजाचा भव्य मूक मोर्चा शांततेत(video)

पंढरपुरात वडार समाजाचा भव्य मूक मोर्चा शांततेत(video)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पंढरपूर: प्रतिनिधी 

नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्येच्या निषधार्थ आणि मारेकऱ्यांना कडक शासन व्हावे या मागणीसाठी वडार समाजाच्या वतीने प्रचंड मोठा मूक मोर्चा काढण्यात आला. १८ मार्चला संदीप पवार यांचा गोळ्या घालून, कोयत्याने वार करून खून केला होता. 

या पार्श्वभूमीवर सोमवारी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले.  सोमवारी सकाळी  ११ वाजता भादुले चौकातून सुरू झालेला हा मोर्चा  दुपारी १२ वाजता तहसीलदार कार्यालयावर येऊन धडकला, मोर्चा मध्ये मोठ्या संख्येने महिलांचाही सहभाग होता. रणरणत्या उन्हात ५ हजाराहून जास्त महिला, पुरुष आणि युवक या मोर्चात सहभागी झाले. या मोर्चात ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संघटनेचे प्रमुख व नवी मुंबईतील शिवसेनेचे पक्ष नेते विजय चौगुले, माजी नगराध्यक्ष दगडू धोत्रे, दगडू घोडके, वामन बंदपट्टे, नगरसेविका आणि मयत संदीप पवार यांच्या मातोश्री सुरेखा पवार, नगरसेवक सुधीर धोत्रे, मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे, महादेव धोत्रे यांच्यासह वडार समाजातील हजारो लोक सहभागी होते. मोर्चा शांततेत संपन्न झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात होता.


  •