Thu, Nov 15, 2018 10:17होमपेज › Solapur › विठ्ठल मंदिर दर्शन पास काळाबाजार विधानसभेत मांडू : पृथ्वीराज चव्हाण 

विठ्ठल मंदिर दर्शन पास काळाबाजार विधानसभेत मांडू : पृथ्वीराज चव्हाण 

Published On: Sep 04 2018 10:10AM | Last Updated: Sep 04 2018 10:09AMपंढरपूर : प्रतिनिधी

श्री विठ्ठल देवस्थान महाराष्ट्राची अस्मिता असून अशा ठिकाणी दर्शनाचा काळ बाजार होत असेल तर हा प्रकार गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी. एकटा माणूस असा प्रकार करू शकणार नाही. यामागे कोणती सोनेरी टोळी आहे याचा शोध घ्यावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री यांनी पृथ्वीराज चव्हाण येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली. 

यावेळी पुढे बोलताना आमदार चव्हाण म्हणाले की, विट्ठल दर्शनाचा काळाबाजार हे गंभीर प्रकरण असून कुणाच्या संमतीने हा प्रकार चालू होता. यातील वाटणी कुणाकुणाला मिळत होती, यामागे कोणती सोनेरी टोळी आहे याचा शोध घेतला पाहिजे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी संबंधित सदस्यांना निलंबित करावे अशी  मागणी करीत येत्या अधिवेशनात हा प्रश्न सभागृहात उपस्थित करू असेही त्यांनी सांगितले.