Wed, Jan 16, 2019 21:43होमपेज › Solapur › विठोबाचं दर्शन सशुल्कच करा!

विठोबाचं दर्शन सशुल्कच करा!

Published On: Jun 09 2018 1:37AM | Last Updated: Jun 08 2018 11:19PMपंढरपूर : प्रतिनिधी

दर्शनाचा काळा बाजार थांबविण्यासाठी विठोबाचं दर्शन सशुल्कच करा. यासाठी महाराज मंडळींच्या संमतीची गरजंच काय? श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे हायटेक अध्यक्ष अतुल भोसले यांनी मंदिर समितीचा कारभार हाकताना थोडासा सल्ला पंढरपूरकरांचाही घ्यावा असे मत महर्षी वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे  व्यक्त केले आहे. 

 यापुढे श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन सशुल्क करण्यासंदर्भात महाराज मंडळींचा सल्ला घेऊन यासंबंधी निर्णय घेणार असल्याची माहिती  भोसले यांनी दिलीय. महाराष्ट्रातील अनेक देवस्थानांमध्ये सशुल्क दर्शनासाठीची सुविधा उपलब्ध आहे.

पंढरपूरच्या विकासासाठी मंदिर समितीनेही योगदान द्यावं,या समितीचं उत्पन्न वाढवण्यासाठी श्रीविठ्ठल रुक्मिणीचं सशुल्क दर्शन जाहीर करावे.  ज्यांना पंढरपूरमधील सोयी-सुविधांशी व मंदिर समितीच्या कारभाराशी कांहीही सोयरसुतक नाही. सशुल्क दर्शनासंबंधी अशा महाराज मंडळींची संमती घेण्याची गरजंच काय? सल्ला घ्यायचाच असेल, संमती घ्यायचीच असेल तर पंढरपूर मधील रहिवाशी असलेले पंढरपूरकर, सामान्य वारकरी, समाजसेवक, ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत यांचा सल्ला घ्या असेही या प्रसिध्दीपत्रकात गणेश  म्हटले आहे.