Sat, Sep 22, 2018 04:51होमपेज › Solapur › पंढरपूर : शासकीय महापूजा रांगेतील मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते

पंढरपूर : शासकीय महापूजा रांगेतील मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते

Published On: Jul 22 2018 7:39PM | Last Updated: Jul 22 2018 7:37PMपंढरपूर : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेला येणार नाहीत. त्यांच्या ऐवजी शासकीय महापूजा विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेतील पहिल्या वारकरी दाम्पत्याच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच तशी सूचना केल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. यावेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून महाजन, सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित असणार आहेत. वारकरी संप्रदायाच्या इतिहासात पहिल्यांदाच सामान्य वारकऱ्यांस थेट आषाढी एकादशीच्या महापूजेचा मान मिळत आहे. हे वृत्त समजताच वारकरी भक्तांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.