होमपेज › Solapur › विठ्ठलराव कारखान्याच्या वजनकाट्यांची तपासणी

विठ्ठलराव कारखान्याच्या वजनकाट्यांची तपासणी

Published On: Dec 31 2017 1:27AM | Last Updated: Dec 30 2017 11:07PM

बुकमार्क करा
टेंभुर्णी : प्रतिनिधी

साखर कारखान्याचे वजनकाटे तपासणी करणार्‍या भरारी पथकातील सदस्यांनी विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या वजनकाट्याची तपासणी केली. काट्यात कोणतीही तफावत तपासणी पथकास आढळून आली नसून सर्व ऊस वजनकाटे योग्य व अचूक असल्याचे सिध्द झाले आहे.

याबाबत अधिक माहिती की, साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासणीबाबत त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना वजनकाटे तपासणी करण्यासाठी भरारी पथकाची स्थापना करून ऊस वजनकाटे तपासणी करणेस कळविले होते. त्यानुसार 29 डिसेंबर रोजी दु.1.30 वा.सुमारास माढा तालुक्याचे तहसीलदार सदाशिव पडदुणे, वजनमापे निरिक्षक भावसार, विशेष लेखापरिक्षक,सहकारी संस्था (साखर) प्रतिनिधी माडे, पोलिस विभागाकडील पोलिस ठाण्याचे प्रतिनिधी, कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी व माढा तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवाजी विठोबा पाटील या सर्व भरारी पथकातील सदस्यांनी अचानक विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे सर्व ऊस वजनकाट्याची तपासणी केली.