होमपेज › Solapur › श्री विठ्ठल कारखान्याकडून उसाला प्रतिटन ५० रुपये अनुदान

श्री विठ्ठल कारखान्याकडून उसाला प्रतिटन ५० रुपये अनुदान

Published On: Mar 07 2018 11:19PM | Last Updated: Mar 07 2018 9:07PMपंढरपूर : प्रतिनिधी

श्री विठ्ठल सह. साखर कारखाना गळीत हंगाम 2017-18 मध्ये आजपर्यंत 7,62,000 मे. टन उसाचे गाळप केलेले असून चालू गळीत हंगामामध्ये 10 लाख मे. टन गाळपाचे उद्दीष्ठ पूर्ण करणेसाठी दि. 10 मार्च 2018 पासून गळीतास येणार्‍या ऊसास प्र.मे.टन 50 रुपये प्रमाणे अनुदान देण्यात येणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन आ. भारत भालके यांनी सांगीतले.

पुढे बोलताना आ. भारत भालके म्हणाले की, सध्या कारखान्याचा गळीत हंगाम सुरळीतपणे चालू असून ऊस दराच्या बाबतीत आपला कारखाना नेहमीच अग्रेसर राहिला आहे. सध्या उन्हाळा सुरू झालेला आहे.  उन्हाळी परिस्थितीमध्ये उसाच्या वजनामध्ये घट येवून सभासदांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून संचालक मंडळाने जादा दर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामळे सर्व ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासद यांनी आपला गाळपाविना शिल्लक राहिलेला सर्व ऊस श्री विठ्ठल कारखान्यास देऊन सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी व्हा. चेअरमन लक्ष्मण पवार, मोहन कोळेकर, दिनकर पाटील, राजूबापू पाटील, युवराज पाटील, भगिरथ भालके, विलास देठे, दशरथ खळेगे, गोकुळ जाधव, विजयसिंह देशमुख, सूर्यकांत बागल, समाधान काळे, नेताजी सावंत, बाळासोा लोंढे, बाळासोा गडदे-पाटील, उत्तम नाईकनवरे, नारायण जाधव, संतोषकुमार गायकवाड, राजाराम भिंगारे, महादेव देठे, कार्यकारी संचालक आर.डी. पाटील आदी उपस्थित होते.