Mon, Jun 17, 2019 04:12होमपेज › Solapur › बागायती जमिनीचे भूसंपादन कमी करा : खा. मोहिते-पाटील

बागायती जमिनीचे भूसंपादन कमी करा : खा. मोहिते-पाटील

Published On: Jan 12 2018 1:57AM | Last Updated: Jan 11 2018 10:41PM

बुकमार्क करा
अकलूज : तालुका प्रतिनिधी

माळशिरस तालुक्यातून जाणार्‍या संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराज पालखी मार्ग तसेच रेल्वेमार्गावरील भूसंपादन करताना बागायती क्षेत्रांचा अधिकार्‍यांनी विचार करावा, अशी सूचना खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी केली.

खा. मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माळशिरस तालुक्यातील पालखी व रेल्वेमार्गावरील शेतकरी, पालखी मार्गाचे प्रकल्प संचालक व अधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली. यावेळी खा. मोहिते-पाटील यांनी अधिकार्‍यांना शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घेऊन कारवाई करावी, असे सांगितले.

राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक एस.एस. कदम म्हणाले,  माळशिरस तालुक्यातून जाणार्‍या महामार्गाची रूंदी 45 मीटर ठेवण्यात आली आहे. मार्गामध्ये येणारी घरे, शेती, फळबागा, वन झाडे यांचे पंचनामे वन विभाग, कृषी विभाग, प्रांत व तहसील कार्यालयामार्फत करण्यात येणार आहेत. नवीन कायद्यानुसार प्रभावित लोकांना त्याची नुकसान भरपाई मिळणार आहे. गॅझेट प्रसिद्धी देण्यात आले आहे. मोहोळ ते धर्मपुरी या 115 कि.मी. अंतरामध्ये सुमारे 517 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहेत. त्यापैकी 172 हेक्टर जमीन उपलब्ध असून इतर जमिनीचे संपादनाचे काम सुरू आहे. हे काम 30 महिन्यांमध्ये पूर्ण करावयाचे आहे. पंढरपूर-लोणंद रेल्वेमार्गाचे उपमुख्य अभियंता आर. एम. गुप्ता म्हणाले, पंढरपूर-लोणंद रेल्वेमार्गाचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. या मार्गावर  रेल्वे स्टेशन तयार होणार आहेत. अंतिम खर्चाचे बजेटचे काम सुरू असून 31 जानेवारीपर्यंत रेल्वे बोर्डाला अहवाल देण्यात येईल. 

निती आयोगाने मंजुरी दिल्यानंतर टेंडर काढले जाणार आहे. रेल्वेची काही जागा इतर मालकांच्या ताब्यात असल्याने सध्या अडचणी आहेत. कमीत कमी 90 टक्के जागा हातात असल्याशिवाय काम सुरू करता येत नाही. सध्या 60 टक्के जागा बोर्डाच्या ताब्यात आहे. 

हे  काम सुमारे 2 हजार कोटी रुपयांचे असून दिवाळी 2018 च्या आसपास कामास प्रत्यक्षात सुरूवात होईल. या मार्गावर लहान-मोठे असे सुमारे 132 पूल होणार आहेत. हे काम 4 वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.