Sat, Apr 20, 2019 23:52होमपेज › Solapur › पिलीव गावचे जेष्ठ नेते अजितसिंह जहागीरदार याचे निधन 

पिलीव गावचे जेष्ठ नेते अजितसिंह जहागीरदार याचे निधन 

Published On: Feb 11 2018 3:11PM | Last Updated: Feb 11 2018 3:06PMपिलीव : वार्ताहार

माळशिरस तालुक्याचे जेष्ठ नेते, पिलीव गावचे जहागीरदार घराण्यातील व गावचे माजी सरपंच अजितसिंह बाळासाहेब जहागीरदार(दादासाहेब)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जहागीरदार यांना वर्षभर पचनेंद्रिय च्या आजाराने दीड वर्ष आजारी होते. 

सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशु संवर्धन समितीचे माजी सभापती संग्रामसिंह जहागीरदार, विकास संस्थेचे संचालक समरजीतसिंह जहागीरदार यांचे वडील व सहकारमहर्षी साखर कारखान्याच्या संचालिका संगीतादेवी जहागीरदार यांचे ते पती होते. तसेच सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे सहकारी व साडू होते. खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे काका व मोहिते पाटील घराण्याशी नातेसंबंधातील होते.त्यांचे ११ वि पर्यंत चे शिक्षण पंढरपूर येथील कवठेकर प्रशालेत झाले होते.त्यानंतर त्यांनी ५ वर्ष सैन्यातही सेवा केली आहे.

सैन्यातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी पिलीव गावचे उपसरपंच ,सरपंच, पंचायत समिती सदस्य, महाराष्ट्र राज्य कापूस एकाधिकार योजनेचे संचालक,माळशिरस तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ,अकलूज च्या शिवामृत दूध संघाचे उपाध्यक्ष, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखाना चे संचालक आदी पदे भूषवून एक कुशल प्रशासक म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता.त्यांनी गावासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र,जनावरांचा दवाखाना, जवाहरलाल शेतकी विद्यालय, कामधेनू दूध उत्पादक सहकारी संस्था,सुळेवाडी विविध कार्यकारी सहकारी संस्था, विजय सहकारी पतसंस्था ,शिवशंकर बझार आदी संस्था स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.