होमपेज › Solapur › अर्धनारीनटेश्‍वराचा साडे व वरातीचा कार्यक्रम उत्साहात

अर्धनारीनटेश्‍वराचा साडे व वरातीचा कार्यक्रम उत्साहात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

वेळापूर : वार्ताहर 

वेळापूर (ता. माळशिरस) येथील आराध्य दैवत अर्धनारी नटेश्‍वराचा साडेचा कार्यक्रम हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत व हरहर महादेवचे गजरात  संपन्न झाला. यावेळी वेळापूर ग्रामपंचायतीच्यावतीने देवाला पोषाख परिधान करण्यात आला. तर  तत्पूर्वी गावातुन वाजत-गाजत मानाच्या कावडी आल्या. यामध्ये अशोक माने-देशमुख यांची  कावड,  शिंपी समाज, परीट समाज, मातंग समाज, कैकाडी समाज , वडर समाज , वसंतबापु माने-देशमुख  कावड या सर्व कावडी देवाच्या  दारात रात्री साडेअकराचे आसपास  आल्या. या नंतर सर्व कावडी प्रमुख, यात्रा कमिटी, पंचकमिटी आदींनी  मानाची असणारी  प्रथम क्रमांकाची माळी समाज बळीची  मानाची कावड हरहर महादेवच्या घोषणादेत वाजत गाजत देवाच्या दारात आली. त्यानंतर तोफांच्या सलामीने स्वागत करणेत आले व  शोभेचे दारुकाम यात्राकमिटीच्यावतीने करण्यात आले. या नंतर देवाच्या साडेचा कार्यक्रमास  सुरुवात झाली.    यावेळी विधीवत पूजा होऊन साडेचा कार्यक्रम मध्यरात्री 1.30 वा. संपन्न झाला.  यावेळी  सरपंच सौ. विमलताई जानकर, पांडुरंग मंडले,जीवनराव जानकर, संदिप माने-देशमुख, जावेद मुलाणी, हणमंत कदम,  आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित  होते.  मध्यरात्री 2  वा. वाजत अर्धनारीनटेश्‍वरांच्या पादुकांची व मानांच्या कावडींची वेळापूर शहरातून मिरवणूक काढण्यात  आली व पहाटे सांगता करण्यात आली.


  •