Sun, May 26, 2019 19:37होमपेज › Solapur › सोलापूर : वीर धरणातून नीरा नदीत विसर्ग (Video)

सोलापूर : वीर धरणातून नीरा नदीत विसर्ग (Video)

Published On: Jul 22 2018 7:46PM | Last Updated: Jul 22 2018 10:27PMबोंडले: विजयकुमार देशमुख

नीरा खोर्‍यात सुरू असलेल्या पावसामुळे नीरा खोर्‍यातील भाटघर, नीरा देवधर या धरणमधील पाणी साठा वाढत आहे, तर वीर धरण रविवारी २ वाजता ९७.९५ टक्‍के झालेले आहे.

रविवारी दि.२२ जुलै रोजी दुपारी २ वाजता वीर धरणमधील पाणी साठा ९७.९५टक्‍के झालेला होता, तसेच धरणामध्ये येणार्‍या पाण्याची आवक चांगली असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रविवारी दु.४ वाजता धरणाचा ५ नंबरचा दरवाजा ४ फुटाने उचलण्यात आला असून यामधून ४ हजार ५६३ क्युसेस विसर्ग नीरा नदी पात्रात सोडण्यात आल्याची माहिती वीर धरण, उपविभागीय अभियंता, अजित जमदाडे यांनी दैनिक पुढरीला दिली.

नीरा खोर्‍यातील धरणातील पाणी साठा समाधानकारक झालेला असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर व सांगोला तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण व पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

वीर धरणामधून सध्या खरीप हंगामातील पहिले आवर्तन सुरू असून उजवा कालव्यांद्वारे १५२५ क्युसेस तर डाव्या कालव्यामधून ८२७ क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे हे पाणी सिंचनासाठी सुरू आहे.

नीरा खोर्‍यातील भाटघर. नीरा देवधर व वीर या तीन धरणात आजरोजी ३५.०६ टीएमसी एवढा उपयुक्त पाणी झालेला आहे तर तीन धरणाची सरासरी टक्केवारी ८१.४६ टक्‍के एवढी झालेली आहे.

रविवार दि. २२ जुलै रोजी सकाळी ६ वाजता या तीन धरणामधील पाणीसाठा अनुक्रमे भाटघर ७३.३१ टक्‍के (१७.२३ टीएमसी), निरा - देवधर ७४.६८ टक्‍के  (८.७६टीएमसी) व वीर ९६.४१ टक्‍के (९.०७ टीएमसी) एवढा झालेला होता.