Thu, Jun 20, 2019 01:39होमपेज › Solapur › दोन एसटी बसची अज्ञातांकडून तोडफोड 

दोन एसटी बसची अज्ञातांकडून तोडफोड 

Published On: Jul 21 2018 8:29PM | Last Updated: Jul 21 2018 8:29PMवैराग : प्रतिनिधी 

वैराग सोलापूर मार्गावरील शेळगांव (आर) जवळील यशराज धाब्याजवळ दोन एस .टी. बस वर मोटरसायकल वरून आलेल्या नऊ जणांनी दगड फेक केली. ही घटना आज शनिवार दि.२१ जुलै रोजी दुपारी  घडली. याबाबत अज्ञात नऊ जणांविरुद्ध वैराग पोलिस स्‍टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बार्शी आगारातून सोलापूरकडे जाणारी चार थांबा एस .टी .बस क्र.एम .एच. १४ बीटी ०९७० ही बस सोलापूर कडे जात होती. सदर बस शेळगांव (आर ) जवळ आली असताना बस चालक  विठ्ठल रामचंद्र कांबळे यांना एका अनोळखी इसमाने वडाळा दंगल सुरू असल्याचे सांगितले. यावरून चालकाने एस टी यशराज धाब्याजवळ उभी केली. त्यानंतर थोडया वेळात बार्शी आगाराची सर्व थांबा एस टी बस क्र .एमएच १४ बीटी २४०७ ही बस त्याठिकाणी आली असता त्‍या बसच्या चालकालाही पुढे दंगल सुरू असल्‍यान थांबायला सांगण्यात आले.

त्यानंतर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दारफळ कडून तीन मोटारसायकलवर अज्ञात नऊ जण आले. त्यांनी बस मधील सर्व प्रवाशांना खाली उतरून  दोन्ही बस वर दगड फेक केली. त्यात दोन्ही गाड्याच्या काचा फुटून सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले .या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. 

याबाबत एस. टी .बस चालक विठ्ठल रामचंद्र कांबळे यांनी वैराग पोलिसात फिर्याद दिली असून, अज्ञात नऊ जणांविरुद्ध वैराग पोलिस स्‍टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पो हे कॉ अनिल गोडसे करीत आहेत .