होमपेज › Solapur › ‘वैद्यनाथ’प्रकरणी गुन्हा दाखल करा

‘वैद्यनाथ’प्रकरणी गुन्हा दाखल करा

Published On: Dec 11 2017 1:35AM | Last Updated: Dec 10 2017 9:56PM

बुकमार्क करा

बीड : प्रतिनिधी  

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या रसाची टाकी फुटून झालेली दुर्घटना दुर्देैवी आहे. घटनेत पाच व्यक्तींंचा मृत्यू होऊनही अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. या घटनेस कारखाना प्रशासन जबाबदार असल्याने याप्रकरणी सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांनी केली आहे.

मुंडे यांनी रविवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कारखाना प्रशासनाच्या दबावाखाली येऊन पोलिस प्रशासनाने मुंडे यांना घटनास्थळी जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावर लोकप्रतिनिधींना घटनास्थळी जाऊ न देण्याचा हा प्रकार पोलिस मंत्र्यांच्या दबावाखाली करीत असून याप्रकरणी आपण सभागृहात आवाज उठवू, असे सांगितले. या घटनेत मृत्यू झालेल्या लिंबोटा, देशमुख टाकळी, गाढे पिंपळगाव येथील कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी त्यांचे सांत्वन केले. घटनेत मृत झालेले कर्मचारी हे घरातील प्रमुख असल्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. या कुटुंबीयांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत द्यावी, तसेच जखमींना 5 लाख रुपये मदत देण्याची मागणी त्यांनी केली. घटनेचे आपल्याला राजकारण करायचे नाही, असे ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे, डॉ. संतोष मुंडे, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, रा. काँ. जिल्हा उपाध्यक्ष सुरेश टाक, न. प. पाणीपुरवठा सभापती दीपक नाना देशमुख, नगरसेवक न.प. विजय भोयटे, मार्केट कमिटीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे,  माणिकभाऊ फड उपस्थित होते.