Fri, Apr 26, 2019 20:00होमपेज › Solapur › युटोपियनच्या वजनकाट्याची अचानक तपासणी

युटोपियनच्या वजनकाट्याची अचानक तपासणी

Published On: Dec 30 2017 12:35AM | Last Updated: Dec 29 2017 10:11PM

बुकमार्क करा
मंगळवेढा : तालुका प्रतिनिधी

वैधमापन तपासणी पथकाकडून अचानकपणे  युटोपियन शुगर्स च्या वजन काटयांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये युटोपियन शुगर्सचा वजन काटा हा तंतोतंत, निर्दोष असल्याचा अहवाल दिला आहे.

युटोपियन शुगर्स ने ऊस उत्पादक शेतकरी यांचा गेल्या  वर्षांपासून विश्‍वास संपादन केल्याने ऊस उत्पादकांच्या हिताचा कारखाना अशी कारखान्याची ओळख झालेली आहे. या विश्‍वासास कोणत्याही प्रकारे तडा बसू नये याची पुरेपूर काळजी युटोपियन प्रशासन नेहमीच घेत असते. जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांच्या वजन काट्यांबाबत उलट-सुलट चर्चा सुरू असताना युटोपियनबाबत अशी कधीही चर्चा झालेली नाही. ऊस उत्पादक मोठ्या विश्‍वासाने कारखान्याला ऊस देतात आणि कारखान्याकडून त्यांच्या विश्‍वासाचे जतन केले जाते असे या तपासणीद्वारे दिसून आले आहे. अचानकपणे तपासणी केलेल्या वजन काट्यात कोणत्याही प्रकारचा फरक नसल्याचे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले. पथकामध्येे मंगळवेढ्याचे तहसीलदार.जी.डी.लव्हे, वैधमापन सांगोला शाखेचे एस. आर. तांदळे, एस. एफ. नुले, लेखापरीक्षक स.पतसंस्था(साखर) डी.आर. नेने. शेतकरी प्रतिंनिधी आदी उपस्थित होते.