Wed, May 22, 2019 20:28होमपेज › Solapur › ओटीपी नंबर मागून ऑनलाईन खरेदी करुन 90 हजारांची फसवणूक

ओटीपी नंबर मागून ऑनलाईन खरेदी करुन 90 हजारांची फसवणूक

Published On: Mar 17 2018 11:28PM | Last Updated: Mar 17 2018 11:19PMसोलापूर : प्रतिनिधी
मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर मागून घेऊन ऑनलाईन 90 हजार 120 रुपयांची खरेदी करुन फसवणूक करणार्‍याविरोधात फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पंकज रघुनाथ शिंपी (वय 55, रा. तारांगण अपार्टमेंट, दमाणीनगर, सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पंकज शिंपी यांच्या मोबाईल नंबरवर 8 मार्च रोजी एका अनोळखी व्यक्तीने 8521576123 या मोबाईल क्रमांकावरुन फोन करुन त्याने आपले नाव अमित आहे, असे सांगितले. तो बजाज फायनान्स, मुंबई येथून बोलत असल्याचे सांगून त्यााने शिंपी यांना तुम्ही बजाज फायनान्सकडून एक वस्तू खरेदी केली असून तुम्हाला एक नवीन ईएमआय कार्ड द्यावयाचे आहे, तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एसएमएस येईल व त्यामधील ओटीपी नंबर सांगा, असे सांगितले. त्यामुळे शिंपी यांनी ओटीपी नंबर त्याला दिला. त्यानंतर त्या व्यक्तीने तुम्हाला ईएमआय कार्ड तीन दिवसांनंतर मिळेल, असे सांगून ओटीपी नंबर घेऊन फ्लिपकार्डवरुन ऑनलाईन 90 हजार 120 रुपयांची खरेदी केली व शिंपी यांची फसवणूक केली म्हणून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.

नगरसेविकेच्या कार्यालयातून मोबाईल चोरी भवानी पेठेतील घोंगडे वस्ती येथील  भाजपच्या  नगरसेविका अंबिका पाटील यांच्या ऑफीसमधून चोरट्याने 8 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरुन नेला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली.

याबाबत गणेश शिवानंद पाटील (वय 23, रा. भवानी पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. शुक्रवारी सायंकाळी घोंगडे वस्ती येथील नगरसेविका अंबिका पाटील यांच्या ऑफीसमध्ये होते. त्यावेळी कुणीतरी अज्ञात चोरट्याने पाटील यांचा 8 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरुन नेला म्हणून जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक  फौजदार जाधव तपास करीत आहेत.

13 हजारांचा ऐवज बसस्थानकावरुन लंपास

बसची वाट पाहणार्‍या व्यक्तीच्या बायकोची पर्स चोरुन एका महिलेने 13 हजारांचा ऐवज लंपास केला. याबाबत योगेश सुरेशराव पाटील (रा. निरूपतीनगर, हिंगोली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी सायंकाळी योगेश पाटील यांची पत्नी अनुष्का पाटील या हिंगोलीला जाण्यासाठी सोलापूर बसस्थानकावर आल्या होत्या. त्यांची बस पाहण्यासाठी योगेश पाटील हे लक्ष देत असताना एका अनोळखी महिलेने पाटील यांच्या पत्नीची खाकी रंगाची पर्स चोरुन नेली. या पर्समध्ये रोख रक्‍कम, दोन मोबाईल असा 12 हजार 700 रुपयांचा ऐवज होता. याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार वाल्मिकी तपास करीत आहेत.

Tags : solapur, solapur news, fraud, through OTP fraud, misuse of OTP