Thu, Jul 18, 2019 12:26होमपेज › Solapur › ‘त्या’ दहा वर्षांत महाराष्ट्राची प्रगती : पाटील

‘त्या’ दहा वर्षांत महाराष्ट्राची प्रगती : पाटील

Published On: Jan 18 2018 1:45AM | Last Updated: Jan 17 2018 10:13PM

बुकमार्क करा
मोहोळ ः प्रतिनिधी

दहा वर्षातील प्रगत महाराष्ट्राच्या जडणघडणीत खा. शरद पवार, आ. अजित पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांचे मोठे योगदान असल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा नरखेड जि.प. गटाचे सदस्य उमेशदादा पाटील यांनी व्यक्त केले.

नरखेड येथे जिल्हा परिषद गटाच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा नागरी सत्कार जि.प. सदस्य उमेश पाटील व गटातील प्रमुख नेत्यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. सुरुवातीस एस.टी. स्टँडवर विक्रांत माने, जयदीप साठे यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी जि.प. सदस्य उमेश पाटील, आदित्य गोरे, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, जिल्हाध्यक्ष विक्रांत माने, नगराध्यक्ष रमेश बारसकर, जयदीप साठे, सायरस जाच, कैलास गोरळेकर, निरंजन भूमकर, पं.स. सदस्या रत्नमाला पोतदार, राजशेखर पाटील, हणमंत पोटरे, जगन्नाथ कोल्हाळ, गोविंद पाटील, बालाजी साठे, पंडित ढवण, चंद्रहार चव्हाण, विजय चव्हाण, अंगद ताकमोगे, प्रमोद आतकरे, विनोद पाटील, सुरेश मोटे, प्रदीप पाटील, धर्मराज जाधव, मनोज मोटे, ज्ञानेश्‍वर गोटणे, गणेश मोटे, राहुल कसबे, बाळासाहेब मोटे, पांडुरंग धोत्रे, नाना ढवण, राजकुमार पाटील, ब्रम्हदेव फड, ब्रम्हदेव चव्हाण, सत्यवान कोल्हाळ, विकास मोटे यांच्यासह नरखेड भागातील नागरिक उपस्थित होते.