Thu, Jul 18, 2019 08:06होमपेज › Solapur › उजनी धरणातून कॅनॉल, बोगद्यात पाणी सोडणार

उजनी धरणातून कॅनॉल, बोगद्यात पाणी सोडणार

Published On: Aug 01 2018 8:20PM | Last Updated: Aug 01 2018 8:20PMबेंबळे (व्हिडिओ) : प्रतिनिधी

उजनी लाभक्षेत्र परिसरात पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप पीकांसाठी धरणातून आजपासून (बुधवार दि. 01 ऑगस्ट 2018) पाणी सोडण्यात येणार आहे. अशी माहिती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी दिली.

उजनी धरनात सद्यस्थितीत 33 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झालेला आहे. मात्र, सध्या उजनी लाभक्षेत्र परिसरात पावसाचा खंड पडल्यामुळे पीके कोमेजू लागली असून, या भागातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. शेतकऱ्यांकडून पिकांसाठी पाणी सोडण्याची मागणी होत आहे. त्यानुसार पाणी सोडण्यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक होवून निर्णय होण्यास काही अवधी लागणार होता. तथापि, जिल्ह्यातील पिकांची परिस्थिती व गांभीर्य पाहून पालकमंत्री देशमुख यांनी तातडीने राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याशी संपर्क साधून त्यांना सविस्तर परिस्थिती सांगितली. उजनी धरणातून तात्काळ पाणी सोडण्याची विनंती केली. त्यानुसार जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी उजनी धरणातून खरीप हंगामासाठी कॅनॉल व बोगद्यात आवर्तन सोडण्याबाबत अधिक्षक अभियंता, सोलापूर यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार आज बुधवारी उजनी धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्‍याचे असे पालकमंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.